आज खुप दिवसांनी, खुप जणांनाच्या मागणी नंतर थोडसं लिहिण्याचा प्रयत्न करतेय...
2020-2021 प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं ठरलं;कित्येक जणांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवावे लागले, आर्थिक मंदीला सामोरे जावे लागले, प्रत्येक माणसाची आणि कुटुंबाची अवस्था वेगवेगळी होती. त्या बद्दल कितीही लिहिले तरी अपुरे पडेल एवढं ....पण त्याच काळात खुप नवीन गोष्टी उमजल्या,त्याच काळात मला लिहिण्याची आवड निर्माण झाली आणि Gardening ची आवड नव्याने रुजायला लागली त्या सोबतच मी अनाथ जखमी कुत्र्यांच्या - मांजरांच्या पिल्लाला पुर्ण बर करुन आमच्या घराचा भाग बनवले.
जेव्हा पासून सगळं सुरळीत चालू झालं,कोणी शिक्षणाच्या मागे, कोणी नोकरीच्या शोधात तेव्हा पासून ह्या आवडीसाठी वेळच मिळेनासा झाला. अस फक्त माझ्याच सोबत नाही तर प्रत्येका सोबत झालंय ...
माझ्यात gardening च प्रचंड निर्माण झाली, कोणी मला विचारलं तुला कुठे फिरायला जायचे तर मी पहीले Nursery किंवा plant exhibition म्हणेन 😅.जेव्हा आपण बाहेर राहतो नोकरी-शिक्षणासाठी तेव्हा त्या दुसर्यानाच्या जागेत ही आवड जोपासन कठीण होतं. पण Nursery मध्ये जाणे आणि plant exhibition ला भेट देणं चालूच असतं.
आता दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लिखाणाची ज्या वर खुप जणांनी मला विचारलं कि ,"तू लिहिल का नाही हल्ली ?" तर दिवस भर दमून आल्यावर लिहिणं आणि त्याहूनही ते सगळं टाईप करण्यासाठी वेळ आणि ताकद दोन्ही कमी पडते.पण मनात मात्र खुप गोष्टी येत असतात , एक वर्ष पूर्ण झालं मी नवीन ठिकाणी राहतेय वेगवेगळ्या गोष्टी अनुभवते जसा वेळ मिळेल तसं तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेन.
हे झालं फक्त माझ्याबद्दल पण तुम्ही जर विचार केला तर प्रत्येका सोबतच अस झालं असेल...कोरोना सारख्या महामारीने आपल्यातील अनेक गुणांची / कलेची जाणीव करून दिली होती, आता तिला जपण्याची जबाबदारी मात्र आपली आहे.
"TAKE THE TIME TODAY TO LOVE YOURSELF .YOU DESERVED IT." - Avina Celeste

Comments
Post a Comment